गुजरातमधील व्याराची लढाई: सरकारी रुग्णालय वाचवण्याचा आदिवासींचा संघर्ष
दक्षिण गुजरातमधील आदिवासीबहुल जिल्हा असलेल्या तापीच्या व्यारा गावात आज एक वेगळ्याच प्रकारची लढाई लढली जात आहे. व्यारा जिल्हा रुग्णालय हे खाजगी कंपनीकडे सोपवून मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या प्रस्तावाने या जिल्ह्यातील जनतेला धक्का बसला आहे. याविरोधात तेथील स्थानिक आदिवासी आता उभे राहिले आहेत. हा फक्त एका या निर्णयाविरुद्धचा विरोध नाही, तर एका जनता विरोधी धोरणाचा ही विरोध आहे. जो की सार्वजनिक आरोग्यासाठी नाही, तर नफ्यावर आधारित आहे. प्रत्येकाला स्वस्त आणि चांगले उपचार मिळण्याचा हक्क आहे, त्यासाठी हा संघर्ष उभा राहिला आहे. ही फक्त एका रुग्णालयाची कहाणी नाही, तर “आपली आरोग्यव्यवस्था कोणासाठी आहे — जनतेसाठी की खाजगी कंपन्यांसाठी?” असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.
गुजरातमधील व्याराची लढाई: सरकारी रुग्णालय वाचवण्याचा आदिवासींचा संघर्ष Read More »